वीजकपात करण्यासाठी पंजाबमधील सरकारी कार्यालये सकाळी ७.३० ते दुपारी २ या वेळेत चालू रहाणार !

सरकारची होणार ७० कोटी रुपयांची बचत !

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

चंडीगड (पंजाब) – पंजाबमधील सरकारी कार्यालये सकाळी ७.३० वाजता चालू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कार्यालये दुपारी २ वाजेपर्यंत चालू रहातील. २ मेपासून कामाच्या नव्या वेळा लागू करण्यात आल्या आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यासंदर्भात म्हटले की, हा निर्णय वीज वाचवण्यासाठी घेण्यात आला आहे. २ मे ते १५ जुलैपर्यंत सरकारी कार्यालये या कालावधीतच चालू रहातील.

मान यांनी म्हटले की, सरकारच्या या निर्णयामुळे प्रतिदिन ३३० मेगावॅट विजेची बचत होणार आहे. त्यामुळे सरकारचे ७० कोटी रुपये वाचतील. सरकारच्या या निर्णयामुळे नागरिक त्यांच्या घरच्यांना अधिक वेळ देऊ शकतील. ‘पीक अवर’ म्हणजेच वीजेची मागणी सर्वाधिक असतांना दुपारी दीड ते ४ वाजेपर्यंत वीजेचा सर्वाधिक वापर होतो. या काळात सरकारी कार्यालये बंद असल्याने वीजेची तेवढीच बचत होऊ शकेल. हा निर्णय केवळ सरकारी कार्यालयांसाठी असल्याचे मान यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • वीजकपातीसाठी आप सरकार काही पावले उचलत आहे, हे ठीक आहे; मात्र त्यामुळे सामान्य जनतेचे हाल होणार त्याचे काय ? सकाळी ७.३० वाजता किती लोक त्यांचे काम करण्यासाठी सरकारी कार्यालयात पोचतील ?
  • वीजकपातीसाठी असे टोकाचे निर्णय घेण्याआधी असा निर्णय घेण्याची वेळी आप सरकारवर का आली ?, याचाही विचार करणे आवश्यक !