‘अ‍ॅपल’ आस्थापनाला भारतियाने १३८ कोटी रुपयांना फसवले !

अमेरिकेत ३ वर्षे कारावास आणि १५५ कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा !

कॅलिफोर्निया (अमेरिका) – ‘अ‍ॅपल’या जगप्रसिद्ध आस्थापनाला एका भारतीय व्यक्तीने तब्बल १३८ कोटी रुपयांना फसवले आहे. धीरेंद्र प्रसाद असे या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी तिला ३ वर्षे कारावास आणि १५५ कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. आस्थापनाची फसवणूक आणि कर चोरीमध्ये अ‍ॅपलशी संबंधित दोन आस्थापनांसमवेत काम केल्याची स्वीकृती धीरेंद्र यांनी दिली.


करचुकवेगिरी प्रकरणी धीरेंद्र यांना १५ कोटी रुपयांच्या भरपाईचे आदेशही न्यायालयाने दिला आहे. तसेच ४४ कोटी रुपयांपेक्षा अधिकची मालमत्ता जप्त करण्यासह ६५ कोटी रुपये रोख देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. धीरेंद्र प्रसाद हे वर्ष २००८ ते २०१८ या कालावधीत अ‍ॅपलमध्ये नोकरीला होते.