मालेगावची घटना म्हणजे देशात अराजक निर्माण करण्यासाठी विचारपूर्वक केलेला प्रयोग ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

. . . हे षड्यंत्र उघड होऊ नये, यासाठी नवाब मलिक यांनी हे प्रकरण भाजपवर ढकलले. या घटनेला महाविकास आघाडीचा पाठिंबा होता, असे आरोप फडणवीस यांनी केले.

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : १४ नोव्हेंबर २०२१

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस यांनी गुंडांना मोठ्या पदावर बसवले ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतांना त्यांनी हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादव याला ‘बांधकाम कामगार मंडळा’चे अध्यक्ष केले. असे आरोप अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केले.

अनेक वर्षांची स्वामी समर्थांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण झाली ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मी श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त आहे. स्वामींमुळेच जीवनामध्ये आरोग्य, स्थैर्य आणि समाधान आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे येऊन स्वामींचे दर्शन घेण्याचा मानस होता. स्वामींच्या कृपेने ती इच्छा आज पूर्ण झाली.

देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे कोल्हापूरला महापुराचा फटका ! – मेधा पाटकर

विज्ञानाचा आधार न घेता बांधकाम व्यावसायिकांनी आखलेली पंचगंगेची पूररेषा तत्कालीन फडणवीस सरकारने मान्य केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे कोल्हापूरला महापुराचा फटका बसला.

नवाब मलिक यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून कोट्यवधी रुपयांची भूमी स्वस्त दरात खरेदी केली !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

(म्हणे) ‘सनातन संस्थेचाही गुन्हेगारी जगताशी (अंडरवर्ल्डशी) संबंध जोडायचा का ?

. . . मग ‘सनातनचा दाऊदशी किंवा गुन्हेगारी जगताशी (अंडरवर्ल्डशी) संबंध आहे’, असे म्हणायचे का?,’ असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर उत्तर देतांना केला.

नवाब मलिक यांचा ‘अंडरवर्ल्ड’शी संबंध, शरद पवार यांना पुरावे पाठवणार ! – देवेंद्र फडणवीस

मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचे अमली पदार्थांचा पुरवठादार जयदीप राणा याच्यासमवेत असलेले छायाचित्र प्रसारित केले आहे.

मंत्र्यांचा जावई हर्बल तंबाखू पिकवू शकतो, तर मग शेतकर्‍यांनाही तशी अनुमती द्या ! – देवेंद्र फडणवीस

शेतकर्‍यांनाही हर्बल तंबाखू लावायची अनुमती द्या. असे केल्यावर शेतकर्‍यांना चांगले दिवस येतील, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर केली.

‘मिथिनेल’च्या निर्मितीसाठी केंद्रशासन साखर कारखान्यांना निधीची तरतूद करणार ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

राज्यातील साखर कारखान्यांच्या विविध समस्यांविषयी देवेंद्र फडणवीस यांसह भाजपचे नेते रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.