मंत्र्यांचा जावई हर्बल तंबाखू पिकवू शकतो, तर मग शेतकर्‍यांनाही तशी अनुमती द्या ! – देवेंद्र फडणवीस

डावीकडून देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक

नांदेड – एका मंत्र्यांचा जावई गांजा विकतांना आढळून आला; पण मंत्री म्हणतो की, ही हर्बल तंबाखू आहे. मग आमचे भाजपचे नेते सदाभाऊ खोत म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकर्‍यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवू शकतो, तर शेतकर्‍यांनाही हर्बल तंबाखू लावायची अनुमती द्या. असे केल्यावर शेतकर्‍यांना चांगले दिवस येतील, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर येथे केली. जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे देगलूर पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.