
संभाजीनगर – शहरातील पाणीप्रश्नावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २३ मे या दिवशी महापालिकेवर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्च्याची सिद्धता चालू झाली आहे. ही योजना फसवी आहे. पाणीपट्टी निम्मी झाली; मात्र पाण्याचे काय ? असा प्रश्न करत भाजपचे पदाधिकारी प्रभागांत बैठका घेत आहेत. लोकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रत्येक प्रभागातील पन्ना-बूथप्रमुख, मंडळ अध्यक्ष, शहराध्यक्ष, आमदार, मंत्री आणि विविध विंगचे पदाधिकारी काम करत आहेत. लोकांच्या घरात होणाऱ्या बैठका आता मंदिरात होत आहेत. ‘शिवसेनेची पाणीपट्टी अल्प करण्याची घोषणा फसवी आहे. लेखी आदेश नाहीत. पाणीपट्टी अल्प करून नळाला ४ दिवसांआड नियमित पाणी येणार आहे का ?’, असा प्रश्न केला जात आहे.
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !
पुणे महापालिका समान आणि पुरेसे पाणीपुरवठा योजनेची ‘श्वेतपत्रिका’ काढणार का ?
आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर कार्यवाही करावी !