नागपूर – शहरातील मिहान येथे आय.आय.एम्. संस्थेची भव्य इमारत उभारण्यात आली आहे. ८ मे या दिवशी या इमारतीचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रसाद, सुभाष देसाई, पालकमंत्री नितीन राऊत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरही नेते उपस्थित होते. मिहान परिसरात १३२ एकर भूमीवर आय.आय.एम्.नागपूरचे भव्य ‘कॅम्पस’ साकारण्यात आले आहे.
During the inauguration of #IIMNagpur‘s New Campus at MIHAN at the hands of Hon. President Shri Ram Nath Kovind, an Army Brass Band from Guards Regimental Centre, Kamptee Cantonment filled the event with musical harmony. Towards the end, the band played our National Anthem. pic.twitter.com/Hbakgq4IpJ
— IIM Nagpur (@IIMNagpurIndia) May 8, 2022
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘‘आजचा दिवस आनंदाचा आहे. या संस्थेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा प्रस्ताव पाठवून मिहानमध्ये भूमी देण्यासाठी साहाय्य केले. आय.आय.एम्. संस्थेचा लाभ विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. कौशल्यप्राप्त विद्यार्थी जगभरात जातील. संस्थेतील विद्यार्थ्यांचे १०० टक्के ‘कॅम्पस प्लेसमेंट’ मिळाल्यासाठी संस्थेचे अभिनंदन !’’
Congratulations Nagpur for another glorifying campus at MIHAN.
Inaugurated by our Honourable President Shri Ramnath Kovind.
This is one of the best opportunities for all the aspirants to do the management courses at IIM, Nagpur . @rashtrapatibhvn @nitin_gadkari pic.twitter.com/jUhXZ2AdAq
— Sandip Joshi (@SandipJoshiNGP) May 8, 2022