
मुंबई – महाविकास आघाडीकडून राज्याला पुन्हा अंधाराच्या खाईत लोटण्याचे पाप करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देशातील कोळसा संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विजेच्या भारनियमनाचा निर्णय घेण्यात आल्याचे घोषित केले. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी ट्वीट केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये पुढे म्हटले आहे की, ‘सावध ! ऐका पुढल्या हाका. टँकरमुक्तीतून पुन्हा टँकरयुक्त, भारनियमनमुक्तीतून पुन्हा भारनियमनाकडे, राज्यात केवळ आणि केवळ भ्रष्टाचार. ‘नो गव्हर्नन्स’मुळे जनता हैराण असून आता परिणाम दिसू लागले आहेत. अधोगतीकडे वाटचाल चालू आहे. वायफळ शब्दांपेक्षा प्रशासकीय कौशल्याचा थोडा कस लावून जनतेला तात्काळ दिलासा द्यावा.’
आजपासून महाराष्ट्रात भारनियमन पुन्हा सुरू झाले. यंदा उन्हाच्या झळा तीव्र असताना जनता घामाघूम आणि राज्याला पुन्हा अंधाराच्या खाईत लोटण्याचे पाप महाविकास आघाडीने अखेर केलेच.
वाफाळ शब्दांपेक्षा प्रशासकीय कौशल्याचा थोडा कस लावून जनतेला तत्काळ दिलासा द्यावा, अशी आमची मागणी आहे ❗️— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 12, 2022
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !