मेंदूच्या शस्त्रकर्मानंतर सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या प्रकृतीत सुधारणा !  

‘ईशा फाऊंडेशन’चे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर २० मार्चला मेंदूचे आपत्कालीन शस्त्रकर्म करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहेत, असे देहलीच्या अपोलो रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

विदेशातही चालते मोदींची गॅरंटी (हमी) ! – परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर

मोदींची गॅरंटी (हमी) देशात, तसेच विदेशातही चालते. लोकांचा त्यांच्यावर विश्‍वास आहे. देशाविषयी अभिमानाची भावना पूर्वीपेक्षा अधिक आहे आणि लोकांचा विश्‍वासही वाढला आहे.

देहली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची अटक रोखण्याची याचिका फेटाळली

अंमलबजावणी संचालनालयासमोर (‘ईडी’समोर) उपस्थित रहाण्यास मी सिद्ध आहे. अन्वेषण यंत्रणेने ‘मला अटक करणार नाही’, याची निश्‍चिती दिली पाहिजे’, अशी मागणी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देहली उच्च न्यायालयात केली होती.

वारंवार पुरवणी आरोपपत्रे सादर करणे, ही चुकीची प्रथा ! – सर्वोच्च न्यायालय

अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) वारंवार सादर  केली जात असलेली पुरवणी आरोपपत्रे ही चुकीची प्रथा आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने ईडीला उद्देशून आदेश दिला आहे.

(म्हणे) ‘आज आमच्याकडे खर्च करण्यासाठी २ रुपयेही नाहीत !’ – राहुल गांधी यांचा दावा

बँक खाती गोठवून १ महिना उलटला आहे. या काळात काँग्रेसने पक्षाच्या कार्यक्रमासाठी, भारत न्याय यात्रेसाठी लाखो रुपये खर्च केलेले आहेत, हे पैसे काँग्रेसने कुठून आणले, याचा हिशेब राहुल गांधी यांनी आधी दिला पाहिजे !

तुम्ही ईडीसमोर उपस्थित का होत नाही ? – उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री केजरीवाल यांना प्रश्‍न

देहली उच्च न्यायालयाने देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मद्य घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाला (‘ईडी’ला) समन्स बजावले. न्यायालयाने  ईडीला तिची बाजू मांडण्यासाठी २ आठवड्यांची मुदत दिली आहे.

निवडणूक आयोगाने बंगालचे पोलीस महासंचालक आणि ६ राज्यांचे गृहसचिव यांना पदावरून हटवले !

 निवडणूक आयोगाने १८ मार्च या दिवशी बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांच्यासह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि गुजरात या ६ राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचा आदेश जारी केला आहे.

एका वासनांध मुसलमानाने शाळकरी मुलीचे घेतले चुंबन !

लव्ह जिहाद, बलात्कार, विनयभंग करणार्‍या वासनांध मुसलमानांमुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? अशांच्या संदर्भात निधर्मीवादी का बोलत नाहीत ?

EAM On CAA : सीएएसारखा कायदा करणारा भारत हा पहिला देश नाही !

जगाला शहाणपण शिकवणारी अमेरिका आणि युरोपीय देश यांसारख्या स्वयंघोषित शहाण्यांना भारताने अशाच प्रकारे सुनावून त्यांना त्यांची जागा दाखवून देत राहिले पाहिजे !

भारतीय नौदलाने अपहरण झालेल्या व्यापारी नौकेची केली सुटका

भारतीय नौदलाने समुद्री दरोडेखोरांनी (चाच्यांनी) ३ मासांपूर्वी अपहरण केलेली नौका ‘एम्.व्ही रौन’ची सुटका केली आहे. या नौकेवरील १७ कर्मचार्‍यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.