सरकार दीप सिद्धू याला अटक करत नाही; मात्र २०० शेतकर्‍यांना अटक करते ! – संजय राऊत यांची राज्यसभेत सरकारवर टीका

आपल्या देशात अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्यासारख्या लोकांना देशप्रेमी म्हटले जाते आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढणार्‍या शेतकर्‍यांना देशद्रोही ठरवले जाते.

सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक खासदारांना आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना भेटण्यापासून गाझीपूर सीमेवर पोलिसांनी रोखले !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार देहलीच्या गाझीपूर सीमेवर शेतकर्‍यांना भेटण्यासाठी पोचले असता त्यांना देहली पोलिसांनी सीमेवरच अडवले.

देहलीऐवजी चीनच्या सीमेवर खिळे ठोकले असते, तर चीनने घुसखोरी केली नसती ! – संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

महाविकास आघाडीचे सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्‍वास आम्ही शेतकरी नेते राकेश टिकैत यांना देऊ. त्यांच्या लढ्याला बळ देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.

६ फेब्रुवारीला देशभर रस्ता बंद आंदोलन ! – किसान मोर्चाची घोषणा

असे बंदचे आयोजन करून जनतेला वेठीस धरणार्‍या संघटना आणि त्यांचे नेते यांच्यावर कारवाई आवश्यक !

(म्हणे) अल्लाच्या कृपेने आणि साहाय्यामुळे स्फोट घडवणे शक्य झाले !

देहलीतील स्फोटाचे दायित्व जैश-उल्-हिंद या आतंकवादी संघटनेने स्वीकारले असून भारतातील प्रमुख शहरांवर आक्रमण करण्याचा हा प्रारंभ आहे तसेच भारत सरकारकडून करण्यात येणार्‍या अत्याचारांचा हा सूड आहे,’ असे म्हटले गेले आहे.

देहलीतील इस्रायलच्या दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट : ४ – ५ गाड्यांची हानी

राजधानी देहलीत अशा प्रकारचे बॉम्बस्फोट होणे अपेक्षित नाही !

राजदीपाखाली अंधार !

राजदीप सरदेसाई, काँग्रेसचे नेते शशी थरूर आणि अन्य ५ पत्रकार यांवर देहली येथील हिंसाचाराविषयी सामाजिक माध्यमांतून खोटी माहिती पोस्ट केल्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा उत्तरप्रदेश पोलिसांनी नोंदवला आहे.

देहली पोलिसांकडून शेतकरी नेत्यांच्या विरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी !

देहली पोलिसांकडून २० हून अधिक शेतकरी नेत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. यासह शेतकरी नेत्यांची पारपत्रे जप्त करण्याची कारवाईही चालू केली जाणार आहे.

देहलीतील हिंसाचाराच्या प्रकरणी २६ जणांच्या विरोधात गुन्हे नोंद

केवळ गुन्हे नोंद करून सरकारने थांबू नये, तर अशांना तात्काळ अटक करून कारागृहात डांबवे आणि जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !

देहलीतील ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचारात ३०० पोलीस घायाळ !

पोलीस हिंसक जमावाकडून मार खातात, याचा अर्थ ‘हिंसाचार करणार्‍या जमावाला ताळ्यावर कसे आणायचे, याचे प्रशिक्षण पोलिसांना मिळत नाही’, असे समजायचे का ? जमावाकडून मार खाणारे पोलीस जनतेचे आतंकवाद्यांपासून रक्षण काय करणार ?