
नवी देहली – इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारलेले जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांनी लिहिलेल्या ‘मुहंमद’ या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी करण्यात आलेली याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या पुस्तकातून इस्लाम, महंमद पैगंबर आणि कुराण यांच्याविरोधात लिखाण करण्यात आल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता. कमर हसनैन यांनी ही याचिका प्रविष्ट करून त्यागी यांना भविष्यात अशा प्रकारचे लिखाण न करण्यासाठी २ कोटी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.
Delhi HC refuses to ban Wasim Rizvi’s book ‘Muhammad’, plea demanded to destroy all copies, sold and unsold: Detailshttps://t.co/rpc0osqE4R
— OpIndia.com (@OpIndia_com) December 31, 2021
न्यायालयाने याचिका फेटाळतांना म्हटले की, या याचिकेला कोणताही आधार नाही. यात ज्या मागण्या करण्यात आल्या आहेत, त्या वैयक्तिक नाहीत. या प्रकरणात याचिकाकर्त्याला वैयक्तिक किंवा कायदेशीर हानी झालेली नाही. त्यामुळे अशा याचिकेवर सुनावणी करण्यासाठी कायद्यात कोणताही आधार नाही. यामुळेच ती फेटाळण्यात येत आहे.
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी नवीन विशेष अन्वेषण पथकाची स्थापना
UP Conversion Racket : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धर्मांतर करणार्या टोळीतील ७ जणांना अटक !