चीन सैन्याने भारताच्या नियंत्रणातील गलवान खोर्‍यात त्याचा राष्ट्रध्वज फडकावलेला नाही ! – भारतीय सैन्याचे स्पष्टीकरण

सौजन्य : NDTV

नवी देहली – चीनकडून प्रसारित करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये चिनी सैनिक गलवान खोर्‍यामध्ये चीनचा राष्ट्रध्वज फडकावत असल्याचे दिसत आहे. ५ मे २०२० मध्ये गलवान खोर्‍यात ज्या ठिकाणी भारत आणि चीन सैन्यांत संघर्ष झाला अन् जो भाग भारताच्या कह्यात आहे, तेथे हा ध्वज फडकावण्यात आल्याचे म्हटले जात आहे; मात्र भारतीय सैन्याने यावर स्पष्टीकरण देत ‘चीनच्या सैनिकांनी त्यांचा राष्ट्रध्वज फडकावल्याची जागा चीनच्या कह्यात असलेल्या गलवान खोर्‍याच्या भागातील आहे’, असे म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. चीनच्या सैन्याकडून व्हिडिओ प्रसारित झाल्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती.