उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. भार्गवी कोकरे ही या पिढीतील एक आहे !
पंढरपूर येथील चि. भार्गवी कोकरे हिची आजी सौ. वैशाली मुद्गल (आईची आई) आणि तिचे वडील श्री. अमित कोकरे यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. सौ. वैशाली मुद्गल (चि. भार्गवीची आजी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. ‘चि. भार्गवी शांत आणि समाधानी आहे.
१ आ. सात्त्विकतेची आवड : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत आणि सनातनच्या आश्रमात अन्य ठिकाणी जाणवलेले दैवी नाद ती भ्रमणभाषवर एकाग्रतेने ऐकते. ते नाद ऐकल्यावर ती शांतपणे झोपते.
१ इ. कुटुंबियांना आनंद होणे : भार्गवीच्या जन्मानंतर आमचे जीवन आनंदी झाले आहे. आमच्या घरात पुष्कळ समाधान आणि शांती आहे. भार्गवीमुळे आम्ही आनंदाने संसारातील सुख-दु:ख अनुभवत आहोत. ‘भार्गवी ही दैवीरूप आहे’, असे आम्हाला वाटते.

१ ई. देवाची ओढ
१. चि. भार्गवीला पांडुरंग पुष्कळ आवडतो. तिची आजी (वडिलांची आई) पांडुरंगाचे अभंग म्हणत असतांना तीही तसे म्हणण्याचा प्रयत्न करते. आजीने ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हटले की, ती हातांनी टाळ्या वाजवते.
२. एकदा भार्गवी तिच्या आजीच्या समवेत पांडुरंगाच्या देवळात गेली होती. त्या वेळी तेथील पुरोहितांनी तिला पांडुरंगाच्या चरणांजवळ नेले. तेव्हा ती दोन्ही हातांनी देवाचे चरण धरत होती. ते पाहून पुरोहित म्हणाले, ‘‘हे बाळ पुष्कळ छान आहे. ते विठ्ठलाचे चरण सोडत नाही.’’
१ उ. संतांनी कौतुक करणे : भार्गवी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आल्यावर आश्रमातील संत म्हणाले, ‘‘हे बाळ किती शांत आहे ! ते सर्व साधकांकडे जाते. तिच्याकडे पाहून आनंद वाटतो. तिचे हसणे पुष्कळ छान आहे.’’
१ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रति भाव : एकदा भार्गवीला तिची आई (पूर्वाश्रमीची कु. गौरी मुद्गल, आताची सौ. गौरी कोकरे, पंढरपूर) म्हणाली, ‘‘चल, आपण रामनाथी आश्रमात प.पू. बाबांकडे जाऊया !’’ तेव्हा भार्गवी परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राजवळ गेली. त्या वेळी ‘भार्गवीला सूक्ष्मातून आनंद वाटत होता’, असे आम्हाला जाणवले.’
२. श्री. अमित कोकरे (भार्गवीचे वडील), पंढरपूर

भार्गवी ही देवाने मला दिलेली अनमोल भेट आहे. ती हसली की, माझा दिवस आनंदात जातो. पांडुरंगाने माझे कल्याण करण्यासाठी अशी गोड मुलगी मला दिली आहे.’
३. स्वभावदोष
रागीटपणा आणि हट्टीपणा.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २२.१२.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |