सात्त्विकतेची आवड असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची शिवमोग्गा, कर्नाटक येथील कु. शरण्या महेश शेट (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. शरण्या महेश शेट ही या पिढीतील एक आहे !

चैत्र कृष्ण पंचमी (१८.४.२०२५) या दिवशी कु. शरण्या महेश शेट हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आईला जाणवलेली शरण्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. शरण्या शेट

कु. शरण्या महेश शेट हिला आठव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१. जन्म आणि जन्मानंतर 

अ. शरण्याचा जन्म होत असतांना आम्ही श्रीरामाचा नामजप सामूहिकपणे करत होतो.

आ. शरण्याचा जन्म झाल्यानंतर तिच्या अंगावर दैवी कण दिसले.

इ. शरण्या रडू लागल्यास श्रीरामाचा नामजप केल्यावर ती शांत होत असे.

सौ. कांचन शेट

२. उपजतच असलेली सात्त्विकतेची आवड

अ. खेळत असतांना शरण्या पोटाने सरकत देवघरापुढे जाऊन खेळत असे. घरातील बैठक कक्षात श्रीकृष्णाचे चित्र लावले आहे. तेथे ती खेळत रहायची. अन्य खेळणी घेऊन खेळण्याऐवजी ती ‘सनातन प्रभात’बरोबर खेळायची.

आ. शरण्या दीड वर्षाची असतांना आम्ही मंगळुरू येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तिथे साधक क्षमायाचना करून महाप्रसाद घेत होते. ते पाहून तिनेही क्षमायाचना करून महाप्रसाद घेतला.

इ. शरण्या प्रतिदिन एकाग्रतेने नामजप करते. ती जेवण आणि अभ्यास करतांना प्रार्थना करते.

ई. एकदा आम्ही पेठेत गेलो होतो. तेव्हा मार्गावर दिसणार्‍या प्रत्येक मंदिराकडे पाहून ती नमस्कार करत होती.

उ. एकदा भक्तीसत्संग ऐकतांना शरण्याने २५ पेक्षा अधिक वेळा नमस्कार केला.

३. स्वावलंबी  

शरण्या स्वतःचा अभ्यास आणि गृहपाठ स्वतःच करण्याचा प्रयत्न करते.

४. शिकण्याची आवड  

शरण्याला नवीन नवीन सेवा शिकण्याची पुष्कळ आवड आहे. ती सेवा शिकण्यासाठी उत्सुक असते आणि त्याप्रमाणे आदर्श  कृती करते.

५. शरण्याकडून काही चूक झाल्यास ती क्षमायाचना करते. 

६. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी शरण्याविषयी सांगितलेले भविष्य 

शरण्याची जन्मपत्रिका बघून एक धर्मप्रेमी, ज्यांनी ज्योतिष आणि संख्या शास्त्र यांचा अभ्यास केला आहे, ते म्हणाले, ‘‘शरण्याची प्रत्येक कृती आध्यात्मिक स्तरावरील असते. तिच्या जन्मराशीत दोन उच्च ग्रह आहेत, जे केवळ संतांच्या जन्मपत्रिकेत असतात !’’

– सौ. कांचन शेट (कु. शरण्याची आई), शिवमोग्गा, कर्नाटक. (२५.५.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.