उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. निरीक्षा ए. ही या पिढीतील एक आहे !
‘चैत्र कृष्ण द्वितीया (१५.४.२०२५) या दिवशी कु. निरीक्षा ए. हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. निरीक्षा ए. हिला १२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. जन्मापूर्वी
अ. ‘मी गर्भारपणात नामजप करत होते.
आ. मला ‘देवळात जावे’, असे वाटत असे. मी देवाची माहिती असलेली पुस्तके वाचत असे. मी सनातनचे ग्रंथही वाचत असे. मी प्रतिदिन श्रीरामरक्षास्तोत्र म्हणत असे.

२. जन्म ते १ वर्ष
२ अ. शांत : ‘निरीक्षा फारशी रडत नसे. ती कुणाच्याही समवेत असली, तरीही शांत असे.
३. वय २ ते १२ वर्षे
३ अ. शिकण्याची वृत्ती : मी तिला शिकवलेले श्लोक ती स्पष्टपणे म्हणते. ती मोठ्या माणसांनी सांगिलेल्या गोष्टी ऐकते आणि त्यातून शिकते.
३ आ. ती तिच्या सर्व वस्तू व्यवस्थित ठेवते.
३ इ. धर्माचरण करणे : ती बांगड्या घालून आणि कपाळाला कुंकू लावून शाळेत जाते.
३ ई. घरकामात साहाय्य करणे : ती मला देवपूजा करतांना आणि घरकामात साहाय्य करते, उदा. केर काढणे, भांडी घासणे. घरी कुणाला बरे नसल्यास निरीक्षा त्यांची काळजी घेते.
३ उ. ती सर्वांशी जुळवून घेते.
३ ऊ. व्यष्टी साधनेची आवड : ती नामजप एकाग्रतेने करते. ती अत्तर आणि कापूर यांचे उपाय करते. ती प्रतिदिन प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करते. ती श्रीकृष्ण आणि गुरु यांना भावपूर्ण नमस्कार करते. ती देवांविषयी कथा असलेले ग्रंथ वाचते. ती बालसंस्कारवर्गात सहभागी होते.
३ ए. गुरूंप्रती भाव : एकदा शाळेत तिची परीक्षा चालू असतांना तिला काही प्रश्नांची उत्तरे लक्षात येत नव्हती. तेव्हा तिने श्रद्धेने गुरुचरणी प्रार्थना केली. नंतर काही वेळाने तिला उत्तरे आठवली. तिने चांगल्या प्रकारे उत्तरे लिहिली. एकदा तिला अकस्मात् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा तिची पुष्कळ भावजागृती होऊन तिच्या डोळ्यांत भावाश्रू आले. याविषयी तिने सर्वांना आनंदाने सांगितले. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) छायाचित्र पहाताच तिची भावजागृती होते.’
– सौ. कविता (कु. निरीक्षाची आई), शिवमोग्गा, कर्नाटक. (१०.६.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.