संतसेवेची आवड असलेला ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील कु. श्रीराम उपेंद्र महाजन (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्विक ) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. श्रीराम उपेंद्र महाजन हा या पिढीतील एक आहे !

‘चैत्र कृष्ण तृतीया (१६.४.२०२५) या दिवशी लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील कु. श्रीराम उपेंद्र महाजन याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला लक्षात त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. श्रीराम महाजन

कु. श्रीराम महाजन याला ९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ऐकण्याची वृत्ती

‘श्रीरामला एखादी गोष्ट समजावून सांगितली, तर तो ती गोष्ट गांभीर्याने आणि नियमितपणे करतो. त्याला टिळा लावण्याचे महत्त्व सांगितलेले आहे. तो शाळेत, तसेच खेळायला जातांना नियमितपणे टिळा लावून जातो.

सौ. भक्ती महाजन

२. साधनेची आवड

अ. त्याला एक घंटा दत्तगुरूंचा नामजप करायला सांगितले आहे. माझ्या समवेत दुचाकीवरून शाळेत जातांना आणि येतांना तो प्रार्थना करून दत्तगुरूंचा नामजप करतो.

आ. तो बालसंस्कारवर्गातील सूत्रे एकाग्रतेने ऐकतो. मी ऑनलाईन सत्संगाच्या संदर्भातील सेवा करत असतांना सांगितलेली सूत्रे त्याने ऐकली आहेत. आता तो बालसंस्कारवर्गात त्याप्रमाणे सूत्रे मांडतो.

इ. मी एखाद्या सेवेला जातांना त्याला समवेत घेऊन गेले, तर तिथे तो स्वतःहून सेवेत सहभागी होतो.

३. चुकांविषयीचे गांभीर्य

अ. त्याचे म्हणणे योग्य असल्यास तो मला शांतपणे आणि प्रेमाने वस्तूस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतो. यावरून त्याची मनाची स्थिरता लक्षात येते. तो मला माझ्या चुका प्रेमाने सांगतो आणि आधार देतो.

आ. तो त्याच्या व्यष्टी साधनेचा आढावा देतांना स्वतःच्या चुका प्रामाणिकपणे सांगतो.

४. संतसेवेची आवड

दिवाळीच्या सुटीत तो १५ दिवस त्याच्या आत्याकडे (सौ. भाग्यश्री जोशी यांच्याकडे) मिरज आश्रमात राहिला होता. तेव्हा तो आश्रमातील साधकांशी मिळून मिसळून वागायचा. पू. जोशीआजोबांची (पू. जयराम जोशी, सनातनचे ५१ वे समष्टी संत, वय ८७ वर्षे आणि सौ. भाग्यश्री जोशी यांचे सासरे) सेवा करण्यास तो त्याच्या परीने साहाय्य करायचा. तो आश्रमात नियमितपणे आरतीला जायचा. घरी आल्यावरही तो त्याच ओढीने नियमितपणे आरतीला बसतो. तो स्वतःहून आरतीची आठवण करतो.

५. श्रीरामला आलेली अनुभूती

एक दिवस दूरचित्रवाहिनीवर (टीव्हीवर) अयोध्येतील श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहोळ्याबद्दल बातम्या चालू होत्या. थोड्या वेळाने त्याने ‘मला भिंतीवर परात्पर गुरुमाऊली श्रीरामरूपात दिसली’, असे मला सांगितले.’

– सौ. भक्ती उपेंद्र महाजन (श्रीरामची आई), लांजा, रत्नागिरी. (१२.७.२०२४)

‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. श्रीराम उपेंद्र महाजन उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२५ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२०.३.२०२५)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक