मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन निर्माण करूया ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे विश्वस्त मंदिरांवरील आघातांच्या विरोधात एकत्र येत आहेत. मंदिर विश्वस्तांची महाराष्ट्रभर चालू झालेली चळवळ देशभर पोचवू.’

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांचे विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन !

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करा ! – रत्नागिरी भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र

देशद्रोहासारखे आरोप ज्या ठिकाणी लावले गेले आहेत अशा मंत्र्यांनी तात्काळ त्यागपत्र देणे अभिप्रेत आहे; मात्र संबंधित व्यक्ती स्वतः त्यागपत्र देत नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंत्रिमंडळातून अशा आरोपी मंत्र्याला डच्चू दिला पाहिजे.

मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव कंत्राटदारांकडून घेतलेली टक्केवारी बनावट आस्थापनांच्या माध्यमातून इतरत्र वळवायचे ! – किरीट सोमय्या, भाजप

भाजपच्या किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद – महाविकास आघाडीवर गंभीर आरोप

हे दाऊदचे अराष्ट्रवादी समर्थक !

मोठा गाजावाजा करून कारवाई चालू करायची, थोडे केल्यासारखे काहीतरी दाखवायचे आणि नंतर साटेलोटे झाले की, काढता पाय घ्यायचा, हे या तरी प्रकरणात होऊ नये. भारतीय जनतेला विसराळूपणाचा शाप आहे. आपल्याकडे मोठी प्रकरणेही एवढी घडत असतात की, पुढचे काही घडले की, जनता जुने सर्व विसरून जाते.

अज्ञातांनी कागल (जिल्हा कोल्हापूर) येथील महावितरणचे कार्यालय पेटवले !

महावितरणच्या वीजनिर्मितीमध्ये साखर कारखान्यापेक्षाही मोठा घोटाळा आहे. तो लवकरच चव्हाट्यावर आणू. वीजनिर्मिती आस्थापनेत मंत्र्यांचे लागेबांधे आहेत.

टीईटी अपव्यवहारात राज्यातील अपात्र उमेदवारांची जबाब नोंदणी होणार !

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अपव्यवहार प्रकरणात अपात्र उमेदवारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पोलिसांनी चालू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील १० उमेदवारांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत.

गुजरातमध्ये गेल्या १४ वर्षांत ६ सहस्र कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा !

केंद्र सरकारने या घोटाळ्याची निष्पक्षपणे चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असेच जनतेला वाटते !

पाकचे सैन्यदल प्रमुख आणि भ्रष्टाचारी नेते यांची स्विस बँकेत अब्जावधी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड !

पाकच्या राजकारण्यांना हा पैसा अन्य इस्लामी राष्ट्रांकडून अथवा चीनकडून भारतविरोधी कारवायांसाठी मिळाला आहे का ?, या दृष्टीने अन्वेषण करण्याची मागणी भारताने केली पाहिजे !

(म्हणे) ‘पत्रकार राणा अय्यूब यांचा छळ थांबवा !’ – संयुक्त राष्ट्रे, जिनेव्हा

संयुक्त राष्ट्रांकडून भ्रष्टाचाराचा आरोप असणार्‍या एका हिंदुद्वेषी आणि राष्ट्रघातकी महिला पत्रकाराला अशा प्रकारे पाठीशी घालण्याचा होणारा प्रयत्न त्याच्या प्रतिष्ठेला लज्जास्पद आहे !