वृक्ष लागवडीच्या कामात शासन भ्रष्टाचार सहन करणार नाही ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

वृक्षलागवड हे ईश्वरीय कार्य आहे. याविषयी अपहाराची कोणती तक्रार असेल, तर शासनाला त्याची माहिती द्या. वृक्ष लागवडीच्या कामात शासन भ्रष्टाचार सहन करणार नाही, असे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २३ मार्च या दिवशी विधान परिषदेत केले.

सोनिया गांधी यांच्या जवळचे असणारे हर्ष मंदेर यांच्या संस्थेची सीबीआय चौकशी होणार

तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि सच्चर आयोगाचे माजी सदस्य हर्ष मंदेर यांच्या ‘अमन बिरादरी’ या संस्थेच्या विरोधात सीबीआयकडून चौकशी करण्याचा आदेश ! परकीय देणगी घेण्याच्या कायद्याचे उल्लंघन करून देणगी घेतल्याचा आरोप आहे.

अजमेर दर्ग्याला मिळणार्‍या अर्पणामध्ये भ्रष्टाचार ! – सेवेकरी

हिंदूंच्या मंदिरांचे सरसकट सरकारीकरण करणारी सर्वपक्षीय सरकारे अशा दर्ग्यांचे सरकारीकरण करण्याचे धाडस दाखवतील का ?

गरीब रुग्णांना सवलत न देणार्‍या धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई करणार !  – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

‘रुबी हॉल रुग्णालयातील किडनी रॅकेटमधील मुख्य आरोपी पसार आहेत. ही संघटित गुन्हेगारी असून या रॅकेटचे लोण महाराष्ट्रात पसरले आहे’, असे सौ. मिसाळ यांनी निदर्शनास आणून दिले. त्याला उत्तर देतांना डॉ. तानाजी सावंत यांनी ही घोषणा केली.

रशियाने पाकिस्तानला पाठवलेला ४० सहस्र टन गहू सरकारी अधिकार्‍यांनी हडपला !

यावरून पाक साहाय्य करण्याच्याही पात्रतेचा नाही, हेच सिद्ध होते. अशा पाकला यापुढे साहाय्य करायचे का ?, हे भारतासह अन्य देशांनी ठरवले पाहिजे !

स्थानिक स्वराज संस्थांमधील राज्य सरकारच्या हस्तक्षेपामुळे कोट्यवधींची उधळपट्टी ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

तिथे प्रशासकांच्या माध्यमातून चालू असलेला राज्य सरकारचा हस्तक्षेप तात्काळ थांबला पाहिजे. प्रस्ताव आणि संमती यांच्याविना कोट्यवधीची कामे चालू करणे, हा भ्रष्टाचार असून त्याला आळा बसला पाहिजे.

‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या देशभरातील ११ कार्यालयांवर ‘ईडी’ची धाड

‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या (सी.एन्.आय.च्या) देशभरातील ११ कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) १६ मार्च या दिवशी धाडी घालण्यात आल्या.

कामावर गैरवर्तन केल्याप्रकरणी करार पद्धतीवरील लिपिकाला काढून टाकले !

मुरबाडे यांनी ६ मास जमा झालेले शुल्क विभाग कार्यालयातील लेखा विभागात जमा केले नसल्याचे आढळून आले. त्यानंतर पदाचा दुरुपयोग करून गैरवर्तन केल्याने त्यांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले.

सोलापूर येथे लाच स्‍वीकारतांना तलाठ्याला अटक !

शेतभूमीची फोड करून नाव नोंदणी करण्‍यासाठी माढा तालुक्‍यातील दहिवली येथील तलाठी सहदेव शिवाजी काळे यांना १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक करण्‍यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर पुढील २ आठवडे कोणतीही कारवाई करू नये ! – मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

हसन मुश्रीफ यांना १३ मार्चला मुंबईत अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्याचे समन्स बजावण्यात आले. त्यावर मुश्रीफ न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने वरील निर्देश दिले.