सोलापूर – शेतभूमीची फोड करून नाव नोंदणी करण्यासाठी माढा तालुक्यातील दहिवली येथील तलाठी सहदेव शिवाजी काळे यांना १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १३ मार्च या दिवशी ही कारवाई केली. दहिवली गावात एका व्यक्तीची सामाईक शेतभूमी होती. त्या शेतभूमीची फोड करून विभक्त नोंद करण्यासाठी त्यांनी दहिवली तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. भूमीची फोड करून विभागणी करून सातबारा उतारा देण्यासाठी काळे यांनी ३५ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीने ३० सहस्र रुपये देण्याचे मान्य केले. त्यातील पहिला हप्ता १० सहस्र रुपये स्वीकारतांना काळे यांना रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदाराने काळे यांना पैसे देण्याआधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! |