
मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – थोडा विलंब झाला आहे; मात्र शासनाने योग्य पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यासह देशांतर्गत चालू असलेली विमानसेवाही बंद करण्यात यावी, याविषयी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की, काही दिवस घरामध्ये बसा. जे चालू आहे, ते जगण्यासाठी चालू आहे. जिवावर उदार होऊन पोलीस बाहेर आहेत, ते गंमत म्हणून आहेत का ? पंतप्रधानांनी आवाहन केलेला ‘जनता कर्फ्यू’ ही केवळ चाचणी होती. यानंतरही लोकांनी ऐकले नाही, तर यापेक्षाही गंभीर पाऊल उचलावे लागेल, अशी चेतावणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २३ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेतून दिली.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !