कोलंबिया येथील कारागृहात कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या अफवेनंतर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू

बोगोटा (कोलंबिया) – येथील कारागृहामध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या अफवेनंतर २१ मार्च या दिवशी कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न करतांना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये २३ जणांचा मृत्यू झाला, तर ८३ जण घायाळ झाले. कोलंबियाच्या न्यायमंत्र्यांनी कोरोनाचा संसर्ग झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे.