जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल ‘होम क्वारंटाईन’

जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल

बर्लिन – जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल ‘होम क्वारंटाईन’ (विलगीकरण) झाल्या आहेत. नुकतीच एका डॉक्टरांनी अँजेला मर्केल यांची भेट घेतली होती. ते भेट घेतलेले डॉक्टर कोरोनाच्या वैद्यकीय चाचणीमध्ये ‘पॉझिटिव्ह’ आढळले. त्यामुळे अँजेला मर्केल यांनी वरील निर्णय घेतला आहे.

खबरदारी म्हणून न्यमोकोकल संक्रमक रोखण्यासाठी मर्केल यांना व्हॅक्सिन देण्यात आले आहे. पुढील काही दिवस त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून त्यांच्या विविध चाचण्या करण्यात येणार आहेत. तसेच त्या काही दिवस घरून काम करतील, अशी माहिती मर्केल यांचे प्रवक्ते स्टिफन सीबेरट यांनी दिली.