पुणे – ‘होम क्वारंटाईन’ असलेल्या व्यक्ती दायित्वशून्यपणे घराबाहेर पडत असल्याच्या घटना घडल्यानंतर महापालिकेने पुढचे पाऊल म्हणून ‘होम क्वारंटाईन’ व्यक्तींच्या घराच्या दारावर पत्रक लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर संबंधित व्यक्तीचे नाव आणि ‘होम क्वारंटाईन’च्या समयमर्यादेचा उल्लेख असेल. संबंधित व्यक्ती घरीच आहे कि नाही, याची निश्चिती महापालिकेचे कर्मचारी प्रत्येक २ ते ४ घंट्यांनी करणार आहेत. ‘शहर आणि उपनगरे मिळून २ सहस्र १०६ जणांना ‘होम क्वारंटाईन’ची सूचना दिली आहे. पुढील चार दिवसांत हा आकडा ४ सहस्रांपर्यंत जाईल. ‘होम क्वारंटाईन’चे पालन केले नाही, तर संबंधितांना पालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.