श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने बेघरांना भाजी-पोळी आणि पाणी यांचे वाटप

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील बेघर आणि भिक्षेकरी यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाजी-पोळीचे पाकीट अन् पाणी यांचे वाटप केले. २३ मार्च या दिवशी समितीच्या पदाधिकार्‍यांनी अनुमाने ३५० भाजी-पोळीची पाकिटे आणि पाणी शहरातील बेघरांना वाटले. ३१ मार्चपर्यंत दिवसातून २ वेळा समितीच्या वतीने वाटप करण्यात येईल, असे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.