राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : ९.१.२०२२
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
या वेळी मंचावर उपस्थित असणार्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवत या तरुणाला पकडून त्याच्याकडून चाकू खेचून घेतल्यामुळे मोठी घटना टळली.
देशात अनेक वेळा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी सरकारे पाहिली आहेत. पंतप्रधान वेगळ्या पक्षाचे असले, तरी मुख्यमंत्री अन्य पक्षांचे असतात. असे असले, तरी देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षिततेविषयी अशा प्रकारचा खेळ पाहिला नाही !
जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेत अक्षम्य त्रुटी राहिल्याने ५ जानेवारी २०२२ हा दिवस भारतासाठी अत्यंत भयावह सिद्ध होऊ शकला असता. सुदैवाने तसे झाले नाही !
भाजपचा पराभव झाला पाहिजे. सनातन धर्म नष्ट झाला पाहिजे. काँग्रेस आघाडीचा मुख्य उद्देश सनातन धर्म नष्ट करणे हा आहे. त्यासाठी काँग्रेसने टिकून राहिले पाहिजे, असे विधान तमिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के.एस्. अलागिरी यांनी केले आहे.
देशात गेली ३ दशके जिहादी आतंकवादाने थैमान घातले आहे आणि जो जगालाही त्रासदायक ठरला आहे, तो नष्ट करण्याविषयी ब्रही न काढणारे काँग्रेसचे नेते सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा करतात. यावरून त्यांच्यातील हिंदुद्वेष लक्षात येतो !
हिंदुहिताच्या निर्णयांना वेग आलेला पाहून पुरो(अधो)गामी आणि काँग्रेसी यांच्या पायाखालची वाळू सरकत चालल्याचे जाणवू लागले आहे.‘पुन्हा (कथित) मनुवाद येणार’ असे बोलून सिद्धरामय्या यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.
इस्लाममध्ये धर्मांतर केल्यानंतर हिंदु तरुणींचे पुढे काय होते, ही स्थिती दर्शवणारे आणखी एक उदाहरण !
आता मंदिरांना सरकारीकरणातून मुक्त केल्यास ब्राह्मणांची मक्तेदारी वाढेल, असा विचित्र युक्तीवाद करून हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदुद्वेष्टी काँग्रेस हिंदुविरोधी षड्यंत्र आखत असल्याने हिंदूंनी त्याचा जोरदार विरोध केला पाहिजे !
वास्तविक अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांना करावी लागू नये. केंद्र सरकार स्वतःहून मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी कायदा का करत नाही ?