डेहराडून (उत्तराखंड) येथील घटना
पाण्याच्या वादातून हत्या
हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी मुसलमानांच्या घरांवर केली दगडफेक
प्रशासनाने आरोपी मुसलमानांची अवैध घरे पाडली, १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

डेहराडून (उत्तरप्रदेश) – येथील सहसपूर भागातील बैरागीवाला येथे भाजपचे युवा नेते विनोद कुमार यांची मुसलमानांच्या जमावाने हातोड्याने वार करून हत्या केली. १३ जूनच्या सायंकाळी झालेल्या या घटनेनंतर हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी याचा तीव्र शब्दांत निषेध करत मुसलमानांच्या घरांवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी १२ मुसलमानांच्या नावे गुन्हा नोंदवला आहे, तसेच आरोपी मुसलमानांची अवैध घरे बुलडोझरद्वारे पाडल्याचे समोर आले आहे. विनोद कुमार हे भाजपच्या इतर मागासवर्गीय मोर्चाचे जिल्हा सामाजिक माध्यम समन्वयक होते.
🚨 Dehradun, Uttarakhand: BJP Leader Allegedly Killed by an Armed Muslim Mob Over a Water Dispute
A dispute over water escalated into the brutal murder of a BJP leader with a hammer.
Following the incident, Hindu activists staged protests, while authorities demolished alleged… pic.twitter.com/znfXBO0bF0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 14, 2026
१. शेजारी रहाणारा इम्तियाज याच्यासोबत विनोद कुमार आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यात पाण्यावरून जुना वाद होता. १३ जूनला या सूत्रावरून पाणी दिल्यामुळे पुन्हा वाद झाला. यानंतर लगेचच शस्त्रधारी मुसलमानांच्या जमावाने विनोद कुमार यांच्या घरावर आक्रमण केले.
२. या वेळी विनोद यांची हत्या करण्यात आली. तसेच त्यांचे भाऊ अशोक, राजेश आणि वहिनी सुषमा गंभीर घायाळ झाले.
३. विनोद यांचा घायाळ भाऊ अशोक यांनी पोलीस तक्रारीत म्हटले की, यापूर्वी शेजारच्या शेतातील पाण्यावरून वाद झाला होता. हे शेत इम्तियाजच्या मालकीचे आहे. १३ जूनच्या सायंकाळी ६ वाजता रझ्झाक, इम्तियाज, अमन, युनूस, शाहबाज, शराफल अली, मासूम, आदिल, शामून, सलमान, जावेद, इंतजार आणि बैरागीवाला येथील अनुमाने ३०-३५ इतर रहिवासी, काठ्या, लाकडी फळ्या, हातोडे आणि फावडी घेऊन आमच्या घरात घुसले. त्यांनी आम्हा कुटुंबियांवर आक्रमण केले. यामध्ये विनोदची हातोड्याने हत्या करण्यात आली.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !