‘हिंदु खाटिक समाज आर्थिक विकास महामंडळा’च्या योजनांचा लाभ घेण्याचे अवाहन !

कोल्हापूर – ‘हिंदु खाटिक समाज आर्थिक विकास महामंडळा’च्या वतीने अनुसूचित जातीमधील हिंदु खाटिक प्रवर्गातील अर्जदारांना व्यवसाय चालू करण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. वर्ष २०२६-२७ या आर्थिक वर्षातील उद्दिष्टपूर्तीसाठी पात्र लाभार्थ्यांनी http://mahadisha.mpbcdc.in या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ पद्धतीने आवेदन करून महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एन्.एस्. सावंत यांनी केले आहे.

महामंडळाच्या वतीने अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना राबवण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी ०२३१-२६६३८५३ वर संपर्क साधावा.