अहिल्यानगर येथे धार्मिक सहलीचे आमीष दाखवून आर्थिक फसवणूक !

सहल रहित करून पैसे देण्यास टाळाटाळ

    

अहिल्यानगर – येथे जुलै २०२५ मध्ये अमरनाथ, वैष्णोदेवी आणि अन्य धार्मिक स्थळांच्या सहलीचे नियोजन सांगून त्यात ‘हेलिकॉप्टर’ने दर्शनासाठी जाऊ शकतो’, असे खोटे सांगितले. भाविकांनी विश्वास ठेवून पैसे दिले; परंतु आरोपीने आयोजक आजारी असल्याचे कारण सांगून अचानक सहल रहित केली. यातून ज्येष्ठ नागरिकांसह महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केली. दिनेश पोपट भोर असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी स्मिता अनिल शितोळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

१. आरोपीचा ‘बाबा अमरनाथ’ नावाचा ‘टूर अँड ट्रॅव्हल्स’चा व्यवसाय आहे.

२. आरोपीने ‘हेलिकॉप्टर’ प्रवासासह प्रतिव्यक्ती ३२ सहस्र ५०० रुपये, वाहनाने जाण्यासाठी २६ सहस्र ५०० रुपये असा व्यय ठरवला. ७ महिला आणि १ पुरुष अशा ८ जणांकडून २ लाख ५६ सहस्र रुपये घेतले.

संपादकीय भूमिका

  • जो तो उठतो आणि फसवणूक करतो, अशी स्थिती समाजावरील पोलिसांचा वचक संपत चालल्याचे द्योतक !
  • पोलिसांनी यासाठी कठोर प्रयत्न करणे आवश्यक !