
कराड, १४ जून (वार्ता.) – शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात वाहतूक नियंत्रण शाखेने कठोर पाऊल उचलत जप्त केलेले फटाका ‘सायलेन्सर’ (मोठा कर्णकर्कश आवाज करणारा सायलेन्सर) आणि प्रेशर हॉर्न (मोठा आवाज करणारा भोंगा) ‘रोडरोलर’ (रस्ता सपाट करणारे यंत्र) खाली चिरडून नष्ट केले.
सध्या काही वाहनचालकांकडून वाहनांमध्ये अनधिकृतपणे पालट करून फटाका ‘सायलेन्सर’ आणि मोठा आवाज करणारे ‘प्रेशर हॉर्न’ बसवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर ध्वनीप्रदूषणात वृद्धी होऊन लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच रुग्ण यांना त्रास होत आहे. याविषयी नागरिकांकडून वाहतूक शाखेकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या. (अशा तक्रारी का कराव्या लागतात ? प्रशासनाला ही अडचण लक्षात येत नाही का ? कि प्रशासन याकडे दुर्लक्ष करते ? – संपादक) या तक्रारींची गंभीर नोंद घेत वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने शहरांमध्ये पडताळणी मोहीम राबवण्यात आली.
प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’विषयी देवस्थानांच्या शासनाकडून अपेक्षा !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !
फुलचंद रोकडे यांच्याकडून योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी वस्त्रदान आणि धोंडे जेवण
पिंपरी-चिंचवड बसस्थानकातील एका बसचे छत उखडले !
लोकलमध्ये हिंदूला चाकूने भोसकले; मुसलमानासह तिघे कह्यात !
आजपासून पावसाळ्याचे विशेष वेळापत्रक लागू !