असे करणार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) – पाठखळ येथील प्रहार उद्योग समूह, तसेच कृषी केंद्राचे दुकान आणि गोदाम यांवर कृषी विभागाने घातलेल्या धाडीत खताच्या नावाखाली मिठाची विक्री होत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी १० लाख ४६ सहस्र ७८० रुपयांच्या भेसळयुक्त रासायनिक खतांचा साठा जप्त करण्यात आला असून सतीश मनोहर भोसले (रा. पाठखळ) आणि रविराज शंकर कणसे (रा. सातारा) यांच्याविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शेतकर्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने ही कारवाई केली.
अन्वेषणात संबंधितांनी भेसळयुक्त खतांचा साठा करून त्याची विक्री केल्याचे आढळून आले, तसेच खत विक्रीसंदर्भातील आवश्यक देयके आणि कागदपत्रेही सादर करता आली नाहीत. हरिदास बोंगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचे पुढील अन्वेषण पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे करत आहेत.

सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर