आपत्ती प्रतिसाद दलाला १२५ स्वयंचलित बोटी मिळणार !
मुंबई – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्याकडून शासनाकडे २२३ स्वयंचलित बोटींची मागणी करण्यात आली होती. त्यांपैकी १२५ बोटी देण्याची सिद्धता शासनाने दर्शवली असून त्यासाठी २८ कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे.
११६ दुय्यम कारागृहे बंद होणार
मुंबई – राज्यातील दुय्यम कारागृहे महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली असून ती कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सध्या ११६ दुय्यम कारागृहांपैकी ३६ कार्यरत, तर ८० कारागृहे बंद स्थितीत आहेत.
मुंबई विमानतळाला बाँबची धमकी !
मुंबई – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाँबने उडवून देण्याच्या धमकीचे ईमेल प्राप्त झाले आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. विमानतळ परिसराच्या पडताळणीत पोलिसांना संशयास्पद काहीही सापडलेले नाही.
संपादकीय भूमिका : असुरक्षित मुंबई !
पिसाळलेल्या कुत्र्याचा १५ जणांना चावा
पेण – येथील काही गावांमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने १० ते १५ जणांचा चावा घेतला. यात ते घायाळ झाले आहेत. त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली.
ठाण्यात अवैध मिश्र हायड्रोकार्बन तेलसाठ्यावर धाड
ठाणे – अंबरनाथ तालुक्यात उसाटणे परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या ‘मिक्स हायड्रोकार्बन तेला’च्या मोठ्या साठ्यावर राज्य दक्षता पथकाने धडक कारवाई केली. १ कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवणे चालू होते.
संपादकीय भूमिका : या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी !
पत्नीकडून माजी सैनिकाची हत्या
बेळगाव – जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील ४६ वर्षीय माजी सैनिक संदीप मांजरगी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. अन्वेषणात ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले. सैनिकाच्या नावावर असलेला २ कोटी रुपयांचा विमा घेण्यासाठी, तसेच अनैतिक संबंध उघडकीस येऊ नये; म्हणून संदीप यांची पत्नी सुमा आणि तिचा प्रियकर पुंडलिक डोंबार याच्यासोबत संदीप यांची हत्या केली.
८ भाविकांचा मृत्यू !
पंढरपूर – म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी भाविक निघाले असता तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर त्यांचे चारचाकी वाहन विहिरीत पडून ८ भाविकांचा मृत्यू झाला, तर ७ घायाळ झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अग्नीशमनदलाची यंत्रणा बोलावली आहे. यापूर्वी या विहिरीजवळ कधीच अपघात झाले नसून हा पहिलाच अपघात असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !
अहिल्यानगर येथे धार्मिक सहलीचे आमीष दाखवून आर्थिक फसवणूक !