(म्हणे) ‘सनातन धर्म नष्ट झालाच पाहिजे !’  

तमिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के.एस्. अलागिरी यांची हिंदुद्वेषी विधान !

  • मोगल आणि ख्रिस्ती असणारे ब्रिटीश यांनी सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र हे दोघे इतिहासजमा झाले; मात्र सनातन धर्म आजही टिकून आहे. पक्ष स्थापून दीडशे वर्षे झालेल्या काँग्रेसनेही सनातन धर्मावर आघात करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला सनातन धर्माने हे सर्व आघात परतवून लावले. ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते’, या म्हणीनुसार अलागिरी यांनी कितीही आरोळ्या ठोकल्या, तरी सनातन धर्म तसाच राहील हे त्यांनी कायमचे लक्षात ठेवावे ! – संपादक
  • देशात गेली ३ दशके जिहादी आतंकवादाने थैमान घातले आहे आणि जो जगालाही त्रासदायक ठरला आहे, तो नष्ट करण्याविषयी ब्रही न काढणारे काँग्रेसचे नेते सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा करतात. यावरून त्यांच्यातील हिंदुद्वेष लक्षात येतो ! – संपादक
  • बहुतांश हिंदू हे धर्माभिमानशून्य असल्याने त्यांच्या विरोधात अशा प्रकारचे विधान करण्याचे धाडस होऊनही ते त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाईही करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक
डावीकडून तमिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के.एस्. अलागिरी आणि व्हिसीके पक्षाचे प्रमुख आणि खासदार थिरुमावलावन

चेन्नई (तमिळनाडू) – भाजपचा पराभव झाला पाहिजे. सनातन धर्म नष्ट झाला पाहिजे. काँग्रेस आघाडीचा मुख्य उद्देश सनातन धर्म नष्ट करणे हा आहे. त्यासाठी काँग्रेसने टिकून राहिले पाहिजे, असे विधान तमिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के.एस्. अलागिरी यांनी ‘चाणक्या टीव्ही’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. तमिळनाडूतील काँग्रेसने व्हिसीके (विदुथलाई चिरुथाईगल कत्ची – स्वतंत्र (लिबरेशन) पँथर पक्ष) या मित्र पक्षासमवेत युती केली आहे. त्यावरून त्यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी हे उत्तर दिले.

याआधी म्हणजे २८ डिसेंबर २०२१ या दिवशी काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या समारंभात उपस्थितांना संबोधित करताना अलागिरी यांनी ‘धर्मनिरपेक्षता हे काँग्रेसचे धोरण आहे जे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. काँग्रेस हिंदु धर्माच्या विरोधात नाही’, असे विधान केले होते. (काँग्रेसची धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदुद्वेष आहे, हे आता हिंदूंनी जाणले आहे. त्यामुळेच हा पक्ष आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे ! – संपादक)

वर्ष २०१९ मध्ये व्हिसीके पक्षाचे प्रमुख आणि खासदार थिरुमावलावन यांनी ‘राष्ट्र वाचवा, सनातन धर्माचा नायनाट करा’ या परिषदेचे आयोजन केले होते. व्हिसीके हा  द्रमुक आणि काँग्रेस यांचा मित्रपक्ष आहे. या परिषदेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी भाग घेतला होता.