
अहिल्यानगर – अधिक मासात लेक-जावयांच्या आदरातिथ्याची परंपरा जपली जाते; मात्र या परंपरेला सामाजिक बांधिलकीची जोड देत शेवगाव येथील ‘गुरुदत्त सामाजिक संस्थे’चे सचिव फुलचंद रोकडे यांनी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना घरी निमंत्रित करून पुरणपोळी-आमरसाच्या धोंडे जेवणाची मेजवानी दिली. सोबतच वस्त्रदान आणि लक्ष्मीप्रसाद यांचे वाटप करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
या प्रसंगी ‘गुरुदत्त संस्थे’चे अध्यक्ष अर्जुन फडके, नगरसेवक नीलेश रोकडे, अधिवक्ता संजय सानप, पत्रकार जगन्नाथ गोसावी, सौ. विजया रोकडे, सौ. शोभा फडके, डॉ. प्रल्हाद पाटील आदींसह रोकडे कुटुंबीय आणि स्नेहीजन उपस्थित होते. महेश आणि योगेश रोकडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मूळचे अर्धपिंप्री (ता. गेवराई, जि. बीड) येथील रहिवासी असलेले फुलचंद रोकडे यांनी गरिबी आणि संघर्षमय जीवन जवळून अनुभवले आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी (स्व.) विश्वनाथ रोकडे वर्ष १९७२ मध्ये शेवगाव येथे स्थलांतरित झाले. श्री. फुलचंद रोकडे यांनी अथक परिश्रम, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर उद्योग-व्यवसायात यश मिळवत शेवगावात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गुरुदत्त सामाजिक संस्था, श्री दत्त देवस्थान, योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन ध्यानमंदिर आणि वृद्धाश्रम यांच्या उभारणीत त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे.
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
पुणे येथील विश्रांतवाडीत सहस्रो वारकर्यांसाठी अखंड अन्नछत्र