नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !

  • नसरापूर येथील बालिका अत्याचार प्रकरण

  • जून महिन्यातच निकालाची शक्यता

 

पुणे – नसरापूर येथील बालिकेवर अत्याचार आणि खून प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५३ जणांच्या साक्षींची नोंद झाली. यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण पुरावे समोर आले आहेत. त्यात वैद्यकीय पुरावे, वैज्ञानिक माहिती, लहान मुलांची साक्ष आणि आरोपीची ओळख या घटना महत्त्वाच्या ठरल्या.

१५ जून या दिवशी २ साक्षीदार, १ सायबरतज्ञ आणि मुख्य अन्वेषण अधिकारी यांची साक्ष नोंदवली जाईल. प्रतिदिन चाललेल्या सुनावणीमुळे राज्याच्या इतिहासातील हा सर्वांत जलदगतीने चाललेला खटला ठरू शकतो, असा विश्वास सरकारी अधिवक्ता अजय मिसर यांनी व्यक्त केला. या घटनेची सुनावणी विशेष न्यायालयात प्रतिदिन सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालते.