
मुंबई – राज्यशासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता १ ली ते ८ वीचे नवीन वेळापत्रक घोषित केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत प्रस्तावित असलेल्या त्रिभाषा सूत्राचा यात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आगामी वर्षात विद्यार्थ्यांना तिसर्या भाषेचा अतिरिक्त अभ्यास करावा लागणार नसून सध्याची द्विभाषिक शिक्षणपद्धतच कायम रहाणार आहे.
इयत्ता पहिली ते दुसरीमध्ये भाषा, गणित, खेळ, कला आणि इतर उपक्रमांवर भर देण्यात आला आहे. इयत्ता ३ री ते ५ वीसाठी मराठी, इंग्रजी, गणित आणि परिसर अभ्यास हे विषय आहेत, तर इयत्ता ६ वी ते ८ वीसाठी मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान-तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे, कला, आरोग्य-शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभव आदी विषय आहेत. कोणत्याही इयत्तेत तिसर्या भाषेसाठी स्वतंत्र तासिका ठेवलेली नाही.
इयत्ता १ लीपासून तिसरी भाषा शिकवण्याच्या प्रस्तावाला राजकीय पक्ष, मराठी भाषा आणि शिक्षक संघटना यांच्याकडून विरोध झाला होता, तसेच राज्यभर पुरेशा प्रमाणात भाषा शिक्षक उपलब्ध नसल्याची अडचण समोर आली होती. त्रिभाषा धोरणाचा अभ्यास करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे; मात्र त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. समितीच्या शिफारसींवर सरकारचा अंतिम निर्णय आल्यानंतरच राज्यातील त्रिभाषा सूत्राचे भवितव्य ठरेल.
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
अहिल्यानगर येथे धार्मिक सहलीचे आमीष दाखवून आर्थिक फसवणूक !