लोकलमध्ये हिंदूला चाकूने भोसकले; मुसलमानासह तिघे कह्यात !

   मुंबई – येथे लोकलमध्ये आसनावरून झालेल्या वादातून तिघांनी सतीश पाठक (वय २६ वर्षे) या हिंदु तरुणाच्या पोटात चाकू खुपसला. यात तो घायाळ झाला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यातील एक जण अल्पवयीन असून इमरान इदरीस अन्सारी (वय १८ वर्षे) आणि करण कन्हैयालाल अग्रवाल (वय २२ वर्षे) अशी उर्वरित दोघांची नावे आहेत. मारहाणीची घटना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते खोपोली या मार्गावरील लोकलमध्ये घडली.

संपादकीय भूमिका

प्रत्येक वेळी हिंदूंनाच मुसलमानांची शिकार व्हावी लागते. ही स्थिती कधी पालटणार ?