राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीची दुरवस्था

पिंपरी – राज्य परिवहन महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड बसस्थानकाच्या एका गाडीचे छत उखडले आहे. गाडीचालकाने निघालेले छत स्वत: बसवण्याचा प्रयत्न केला; परंतु ते शक्य झाले नाही. त्याच स्थितीत चालकाने गाडी चालवली. अनेक मार्गांवर जुन्या गाड्यांचा वापर केला जात आहे. वारंवार बिघाड, गळती, तांत्रिक समस्या आणि देखभालीअभावी अशा स्वरूपाच्या अनेक समस्या आणि तक्रारी समोर येतात.
‘गाड्यांची नियमित पडताळणी आणि वेळेवर दुरुस्ती केली असती, तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असते’, असे मत तज्ञांनी व्यक्त केले.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !