६८ अर्ज फेटाळले
पुणे – पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शस्त्र परवान्याच्या संदर्भात कठोर धोरण अवलंबले आहे. शस्त्र परवाना प्रकरणाच्या आढाव्यात १५ व्यक्तींचे पिस्तूल परवाने रहित केले, तर नव्याने शस्त्र परवाना मिळवण्यासाठी आलेले ६८ अर्जही फेटाळले आहेत. नवीन शस्त्र परवाना मागणी करणार्या व्यक्तींना शस्त्र बाळगण्यास सबळ कारण नसल्याने शस्त्र परवाने नाकारले आहेत. ५ शस्त्र परवानाधारक जणांच्या विरोधात शस्त्राचा दुरुपयोग करणे आणि इतरही विविध गुन्हे नोंद आहेत. शस्त्र परवाना संमत केलेल्या २ व्यक्तींनी विहीत मुदतीत शस्त्र खरेदी केली नाही. त्यामुळे त्यांचेही शस्त्र परवाने रहित करण्यात आले. वृद्धत्व आणि मृत्यू पावलेल्या ८ व्यक्तींचे शस्त्र परवाने रहित करण्यात आले. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि शस्त्रास्त्रांचा गैरवापर रोखण्यासाठी भविष्यातही असेच कठोर धोरण राबवण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !