जत तालुक्यातील लवंगा येथे ४ साधूंना मारहाण केल्याचे प्रकरण ! – ७ आरोपींना अटक केलेल्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश !
साधूंना मारहाणप्रकरणी आरोपी असणार्या कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्षाला जनतेने निवडणुकीत लक्षात ठेवावे !
साधूंना मारहाणप्रकरणी आरोपी असणार्या कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्षाला जनतेने निवडणुकीत लक्षात ठेवावे !
याला चित्रपटसृष्टीही कारणीभूत ! काही चित्रपटांमध्ये तर साधू-संत यांना गुंड-माफिया असेही दाखवण्यात आले आहे. सातत्याने दाखवण्यात येणार्या अशा नकारात्मक भूमिकांमुळे समाजमनाचीही भगवे कपडे घातलेल्यांविषयी अयोग्य प्रतिमा अगोदरच सिद्ध झाली आहे. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती वाढत आहे.
‘ज्ञानवापी संकुलातील शृंगारगौरीदेवीची पूजा आणि उपासना यांच्या हक्काचा दावा सुनावणी योग्य असून या प्रकरणात ‘प्रार्थनास्थळे विशेष कायदा (प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट)’ लागू होत नाही’, असा निर्वाळा देत वाराणसी जिल्हा न्यायालयाने ‘अंजुमन इंतेजामिया मस्जिद प्रबंधन समिती’चा दावा फेटाळला.
जे हातात आहे, तेच राखायला काँग्रेसला जमत नसतांना ‘भारत जोडो’सारख्या यात्रा करून काय साध्य होणार आहे ? ‘भारत जोडो यात्रा करून संघाला संपवणार’, अशी भाषा काँग्रेसने केली. संघ सध्या भक्कम स्थितीत आहे; मात्र त्याला संपवण्याची भाषा करणार्या काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे.
गोव्यातील राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
थिरूवनंतपूरम्मध्ये केरळच्या के.ई. मेमन आणि पद्मश्री पी. गोपीनाथन् नायर या दोन क्रांतीकारकांच्या स्मारकाचे अनावरण करण्यासाठी निमंत्रण देऊनही काँग्रेसचे नेते राहुल गांधी अनुपस्थित राहिले. त्यामुळे केरळ प्रदेशाध्यक्ष सुधाकरन् यांना क्षमा मागावी लागली.
गांधी आणि नेहरू परिवारांनी नेहमीच क्रांतीकारकांचा अवमान केला आहे. त्यामुळे राहुल गांधी या कार्यक्रमाला अनुपस्थित रहाणे, ही काही आश्चर्याची गोष्ट नाही ! काँग्रेसने क्षमा मागण्यापेक्षा प्रायश्चित्त म्हणून क्रांतीकारकांचा सन्मान होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
रा.स्व. संघ आणि भाजप यांची काँग्रेसवर टीका ! थिरूवनंतपूरम् (केरळ) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा चालू असतांना काँग्रेसने तिच्या ट्विटर खात्यावर एक पोस्ट केल्याने वाद निर्माण झाला आहे. या पोस्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खाकी चड्डीचे छायाचित्र असून त्याला एका कोपर्यात आग लागली आहे, असे दिसत आहे. यावर चित्रावर लिहिले आहे ‘देशाला … Read more
महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ची अनेक प्रकरणे घडून हिंदु तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असतांनाही सचिन सावंत याविषयी मूग गिळून गप्प आहेत. धर्मांधांचे लांगूलचालन करणे, हा काँग्रेसचा ‘अजेंडा’च याला कारणीभूत आहे !
राहुल गांधी यांच्या भेटीत पाद्री जॉर्ज पोन्नैया यांचे आक्षेपार्ह विधान !