
पुणे – श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे ९ जुलैला पुणे येथे आगमन होणार आहे. त्यापूर्वीपासून पुण्यात लाखो वारकरी वास्तव्यास असतात. त्यांना चांगले रस्ते, पाणी, आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे. यात असुविधा खपवून घेतली जाणार नाही. सर्व कामे वेळेत पूर्ण करा, असे कडक आदेश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला दिले आहेत. महापालिका, पोलीस, पाणीपुरवठा, मलनिःसारण, आरोग्य, विद्युत आणि घनकचरा व्यवस्थापन विभागांच्या अधिकार्यांसमवेत झालेल्या पहाणीत पालखी मार्गावरील प्रत्येक सुविधेचा आढावा घेण्यात आला. या वेळी महापौर सौ. मंजुषा नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, आमदार हेमंत रासने, आयुक्त नवल किशोर राम आदींसह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.
सांगली येथे महापालिकेच्या स्वच्छता अधिकार्याला महिलेकडून मारहाण !
दोषींवर कठोर कारवाई करून ‘मकोका’ लावणार ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री
आज सोलापूर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीचे मतदान !
थोडक्यात महत्त्वाचे : (१८.०६.२०२६)
अधिकमासात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला ९.४६ कोटी रुपयांचे उत्पन्न
सिंहस्थ कुंभपर्वासाठी बोधचिन्ह स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याविषयी सुमित काटे यांचा सत्कार