
पणजी – गोव्यातील प्रसिद्ध ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि शास्त्रीय गायक पद्मश्री पंडित प्रसाद सावकार यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी दु:खद निधन झाले. पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार यांची मराठी नाट्यक्षेत्रात अण्णासाहेब किर्लाेस्करांचे ‘संगीत सौभद्र’ ते अलीकडील डॉ. मीना नेरूरकर यांचे ‘संगीत अवघा रंग एक झाला’ या नाटकापर्यंत अनेक दशकांची दीर्घ अशी यशस्वी कारकीर्द पुढील पिढ्यांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी राहील. पद्मश्री पुरस्कारासहित त्यांना बालगंधर्व सुवर्णपदक, संगीतभूषण राम मराठे स्मृती पुरस्कार, गोवा शासनाचा कलावंत पुरस्कार, दिनानाथ मंगेशकर पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार आदी प्राप्त झाले आहेत. करंझाळे, पणजी येथील रहात्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर १८ जूनला सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार यांची वर्ष २०२२ मध्ये भेट घेण्यात आली होती. त्यांची काही लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक