क्रांतीकारकांच्या स्मारकाच्या अनावरणाला राहुल गांधी अनुपस्थित !

काँग्रेसने मागितली क्षमा !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – येथील एन्.आय.एम्.एस्. रुग्णालयामध्ये केरळचे दोन क्रांतीकारक के.ई. मेमन आणि पद्मश्री पी. गोपीनाथन् नायर यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात येणार होते. यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आमंत्रित करण्यात आले होते; मात्र ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख सुधाकरन् यांना क्रांतीकारकांच्या नातेवाइकांची क्षमा मागावी लागली. या वेळी काँग्रेसचे स्थानिक खासदार शशि थरूर, तसेच  युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे नेते एम्.एम् हसन उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

गांधी आणि नेहरू परिवारांनी नेहमीच क्रांतीकारकांचा अवमान केला आहे. त्यामुळे राहुल गांधी या कार्यक्रमाला अनुपस्थित रहाणे, ही काही आश्‍चर्याची गोष्ट नाही ! काँग्रेसने क्षमा मागण्यापेक्षा प्रायश्‍चित्त म्हणून क्रांतीकारकांचा सन्मान होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !