
ठाणे – श्री सीरवी समाज युवक-युवती परिचय संमेलनाच्या निमित्ताने आयोजित विशेष जनजागृती कार्यक्रमात ‘लव्ह जिहाद’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम १४ जूनला ठाणे येथील श्री आई माताजी मंदिर येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला समाजातील युवक-युवती, तसेच पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्या सौ. प्रवीणा पाटील यांनी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी युवक-युवतींनी विवाह, मैत्री आणि सामाजिक संबंध प्रस्थापित करतांना सतर्क रहाण्याची आवश्यकता अधोरेखित केली, तसेच पालकांनी मुलांशी सातत्याने संवाद साधून त्यांना योग्य संस्कार आणि मार्गदर्शन देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास १२० हून अधिक जण उपस्थित होते.
महाबळेश्वर येथील हनुमान मंदिराचा मार्ग ‘द क्लब’ व्यवस्थापनाकडून खुला
यवतमाळ येथे ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषद’ पार पडली !
हिंजवडी (पुणे) येथे लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
नवी मुंबई महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास प्रारंभ !
महिलेला गर्भवती करून सोडून दिले : गुन्हा नोंद
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार : एका तरुणाला अटक