महिलेविरुद्ध गुन्हा नोंद !

सांगली, १७ जून (वार्ता.) – महापालिकेच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर आलेल्या तक्रारीनुसार विश्रामबाग येथील ‘कोरे आर्केड’ परिसरात विनापरवाना भटकी कुत्री पाळल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेले महापालिकेचे अधिकारी आणि पशूवैद्यकीय विभागप्रमुख अतुल आठवले यांना मयुरी देशपांडे या महिलेने थेट खाली पाडून मारहाण केली. या संतापजनक घटनेप्रकरणी संशयित महिला देशपांडे यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
सौदामिनी पाटील यांनी केलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी महापालिकेचे उपायुक्त स्मृती पाटील, साहाय्यक आयुक्त सचिन सागावकर आणि स्वच्छता अधिकारी अतुल आठवले हे पथकासह अन् ‘डॉग व्हॅन’सह घटनास्थळी गेले होते. चौकशीच्या वेळी ‘मी एकच श्वान पाळला असून बाकीचे माझे नाहीत’, असे मयुरी देशपांडे यांनी सांगितले. अधिकारी त्यांच्याशी बोलत असतांनाच वाद झाल्याने देशपांडे यांनी आठवले यांना मारहाण करण्यास प्रारंभ केला.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !