
महाबळेश्वर – येथील हनुमान मंदिराकडे जाणार्या ब्रिटीशकालीन रस्त्याचा प्रश्न समन्वयाने सुटला आहे. ‘वेण्णा लेक’ येथील हिंदु वीरशैव दफनभूमी, अग्नीसंस्कार स्थळ, पारशी कब्रस्तान आणि हनुमान मंदिराकडे जाण्यासाठी ब्रिटीश काळापासून तहसीलदार कार्यालयामार्गे ‘द क्लब’ गोल्फ मैदानातून रस्ता आहे. स्थानिकांकडून हनुमान जयंती, वार्षिक यात्रा आणि नित्यपूजेसाठी या मार्गाचा उपयोग केला जातो; मात्र अलीकडे ‘द क्लब’ व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वसूचना न देता या रस्त्यावरील प्रवेशद्वार अचानक कुलूपबंद केले होते. यामुळे स्थानिक नागरिक, भाविक आणि पर्यटकांची मोठी गैरसोय होत होती. ‘द क्लब’ व्यवस्थापन आणि भाविक-भक्त यांच्या मध्यस्थीने बैठक पार पडून रस्ता खुला झाला. लेखी आश्वासन ‘द क्लब’च्या अध्यक्ष्या मनीषा गोखले-शहा यांनी दिले.
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
पुणे येथील विश्रांतवाडीत सहस्रो वारकर्यांसाठी अखंड अन्नछत्र
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !