लग्नास नकार, कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी

पुणे – हिंजवडी भागात लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा मानसिक छळ करण्यात आला. लग्न करायचे असेल, तर २ कोटी रुपये, ‘फॉर्च्युनर’ चारचाकी गाडी आणि सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. या प्रकरणी पीडितेने प्रतीक साखरे याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी अभिजित भोंडवे, बहीण प्रियांका साखरे, आई संगीता साखरे आणि मुख्य आरोपी प्रतीक साखरे यांच्यावर गुन्हा नोंद आहे. पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रतीक साखरे याला अटक केली. काही काळाने तो जामिनावर बाहेर आला.
पुन्हा आरोपी पीडिता आणि तिचे कुटुंबीय यांना ठार मारण्याची धमकी देत आहे. आरोपीच्या घरच्यांकडून विविध प्रकारे पीडिता आणि तिचे कुटुंब यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्रासामुळे पीडिता २ दिवस बेशुद्ध होती. त्यानंतर पुन्हा ती न्यायासाठी लढत आहे.
पुणे येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन तपोभूमीचे अस्तित्व अवैध उत्खननामुळे धोक्यात !
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी