पंढरपूर – अधिकमासात भाविकांनी केलेल्या रोख देणग्या, हुंडी अर्पण, सोने-चांदी दान, तसेच विविध सेवांमधून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीस ९ कोटी ४६ लाख २८ सहस्र २३३ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. ही माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. १७ मे ते १५ जून या अधिकमास कालावधीत भाविकांकडून श्रींच्या चरणी ८१ लाख ७२ सहस्र ६७९ रुपये अर्पण करण्यात आले. याशिवाय देणगीद्वारे २ कोटी ३ लाख ५५ सहस्र १८० रुपये, हुंडीपेटीतून २ कोटी ५३ लाख ८२ सहस्र ३४४ रुपये, सोने-चांदी अर्पणातून १ कोटी ७८ लाख ४३ सहस्र १६७ रुपये, भक्तनिवासातून १ कोटी २५ लाख ५६ सहस्र ७२३ रुपये, लाडू प्रसाद विक्रीतून ७२ लाख ३३ सहस्र ७०० रुपये आणि पूजाविधीतून ११ लाख ३ सहस्र ४२७ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले.
अधिकमासात प्राप्त झालेल्या या उत्पन्नाच्या माध्यमातून वारकरी आणि भाविक यांसाठी अधिक चांगल्या अन् पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिरे समिती सातत्याने प्रयत्नशील रहाणार, असे मंदिरे समितीचे व्यवस्थापक श्री. प्रवीणकुमार घम यांनी सांगितले.

पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
कामोठे येथे भटक्या कुत्र्याचे १० जणांवर आक्रमण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
पुणे शहरात १९ जुलैला ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव’ !
आषाढी यात्रेसाठी ११ लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती ! – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी