मालेगाव येथे विद्यालयात २८ लाख ५५ सहस्र २९० रुपयांचा अपहार !

  • शिक्षणक्षेत्रात होत असलेले अपहार आणि अपप्रकार 

  • माजी मुख्याध्यापकांसह दोघांवर गुन्हा नोंद !

मालेगाव – तालुक्यातील टेहरे येथील एका सर्वांगीण विकास मंडळ संचलित समता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात २८ लाख ५५ सहस्र २९० रुपयांचा अपहार झाला आहे. या प्रकरणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जिभाऊ शेवाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शाळेचे माजी मुख्याध्यापक ज्ञानदेव पाटील, त्यांच्या पत्नी कमल आणि सून प्रियंका या तिघांविरुद्ध पोलिसांनी फसवणूक, अपहार अन् विश्वासघात यांचा गुन्हा नोंदवला आहे.

संशयितांनी इतर सदस्यांना अंधारात ठेवून आणि दिशाभूल करून २२ जून २०२० ते ७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने संबंधित अधिकोषांमधून पैसे वेळोवेळी काढून घेतले. हा निधी स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी वापरला. हा अपहार लपवण्यासाठी संशयितांनी बनावट शिक्के, खोट्या स्वाक्षर्‍या आणि बनावट कागदपत्रे सिद्ध करून संस्थेचे सदस्य, विद्यार्थी आणि सरकार यांची फसवणूक केली. माजी मुख्याध्यापकांनी या संदर्भातील आरोप फेटाळून लावले आहेत.

संपादकीय भूमिका

  • शिक्षकांनाच नैतिक शिकवण देण्याची अपरिहार्यता दर्शवतात !
  • शिक्षणक्षेत्रात अपहार करणार्‍यांवर कठोर दंडात्मक कारवाई करून त्यांना आजन्म कारागृहात डांबायला हवे !