ठाकरे गटाची चेतावणी

कर्जत – महावितरण कार्यालयाकडून कर्जत तालुक्यात ग्राहकांची अनुमती किंवा संमती न घेता बळजोरीने स्मार्ट मीटर बसवण्याचे काम चालू आहे. या कृतीविरोधात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली. तालुकाप्रमुख बाजीराव दळवी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांची भेट घेऊन त्यांना अधिकृत निवेदन दिले. ‘ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, तसेच स्मार्ट मीटरचा लाभ आणि तोटे यांविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करून खुली चर्चा आयोजित केली जावी. महावितरणने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्वरित योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल’, अशी चेतावणी निवेदनातून देण्यात आली.
अधिकमासात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला ९.४६ कोटी रुपयांचे उत्पन्न
सिंहस्थ कुंभपर्वासाठी बोधचिन्ह स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याविषयी सुमित काटे यांचा सत्कार
खोट्या स्वाक्षर्या करून देयके संमत केल्याच्या प्रकरणी ५ ठेकेदारांवर गुन्हा नोंद
गोव्यात ३० जूनपासून वाहतुकीचे नियम मोडल्यास भ्रमणभाषवर दंडात्मक कारवाईचे ‘चलन’ येणार
संमत वीजभार आणि विजेचा प्रत्यक्ष वापर यांच्या अभ्यासाचे निर्देश
गोव्यात पुढील १५ दिवस पाऊस न पडल्यास १ जुलैपासून पाण्याच्या वापरावर मर्यादा ! – सुभाष फळदेसाई, पाणीपुरवठामंत्री