
पणजी, १७ जून (वार्ता.) – पुढील १५ दिवस पाऊस न पडल्यास आणि स्थिती अशीच राहिल्यास १ जुलैपासून पाण्याच्या वापरावर मर्यादा येणार आहे. पाणी
ते पुढे म्हणाले, ‘‘राज्यात पावसाचे आगमन झालेले असले, तरी अजून पाऊस अपेक्षित असा नाही. पावसाचे प्रमाण ५९.१ टक्के अल्प आहे. प्रतिदिन ऊन पडण्याबरोबरच तापमान वाढत आहे. धरणातील पाण्याची पातळी अल्प होत असल्याने पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याच्या वापरासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्याचा निर्णय खात्याने घेतला आहे. पाणी वितरणाचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे अजूनपर्यंत पाण्याची कमतरता भासलेली नाही. अजूनही सर्वच ठिकाणी पूर्वीसारखाच पाणीपुरवठा चालू आहे, तरीही दक्षतेचा उपाय म्हणून पाण्याचा वापर करण्याविषयी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्याचा निर्णय झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर बागेतील झाडे शिंपणे किंवा वाहने धुणे यांसाठी करू नये. पिण्याच्या पाण्याचा वापर इतर कामांसाठी करता येणार नाही.
सांगे येथे सर्व परिसरात आवश्यक तेवढे पाणी मिळत आहे. निवडणूक जवळ आल्याने काही जण आता पाण्याचा प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. सांगे येथे तक्रारी असलेल्या ठिकाणी उपजिल्हाधिकार्यांनी पहाणी करून पाण्याची उपलब्धता पडताळली आहे. या भागात पाण्याशी संबंधित कसलीच समस्या नाही.’’
एअरटेल आस्थापनाच्या विरोधात प्रथमदर्शनी गुन्हा नोंद

मंत्री सुभाष फळदेसाई पुढे म्हणाले, ‘‘तोरसे- पेडणे येथे एअरटेल आस्थापनाचे काम चालू असतांना जलवाहिनी फुटली आणि यामुळे पाणी वाया गेले. खात्याने एअरटेल आस्थापनाला नोटीस पाठवली आहे. या आस्थापनाच्या विरोधात प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवून हानीची भरपाई आस्थापनाकडून वसूल केली जाणार आहे.’’
सांगली येथे महापालिकेच्या स्वच्छता अधिकार्याला महिलेकडून मारहाण !
दोषींवर कठोर कारवाई करून ‘मकोका’ लावणार ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री
आज सोलापूर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीचे मतदान !
थोडक्यात महत्त्वाचे : (१८.०६.२०२६)
अधिकमासात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला ९.४६ कोटी रुपयांचे उत्पन्न
सिंहस्थ कुंभपर्वासाठी बोधचिन्ह स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याविषयी सुमित काटे यांचा सत्कार