
यवतमाळ – येथे १५ जून या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषद’ पार पडली. या परिषदेला यवतमाळ शहर आणि विविध तालुके येथून ६५ हून अधिक मंदिरांचे विश्वस्त अन् पुजारी आले होते. परिषदेला मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी देवस्थान इनाम भूमीविषयीचा धर्मशास्त्रीय दृष्टीकोन मांडला. या वेळी त्यांनी देवस्थान भूमी संरक्षण कायद्याविषयी पुढील दिशा स्पष्ट केली, तसेच मंदिरांच्या रक्षणासाठी व्यापक संघटनाची आवश्यकता असल्याचे सांगितले. हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी परिषदेची प्रास्ताविक भूमिका मांडली. त्यांनी महाराष्ट्र मंदिर महासंघाने आतापर्यंत केलेल्या कार्याचा आणि मिळालेल्या ऐतिहासिक यशाचा आढावा दिला.
उपस्थित मंदिर विश्वस्तांनी त्यांच्या मंदिरांच्या भूमी वाचवण्यासाठी केलेल्या संघर्षाचे आणि प्रयत्नांचे अनुभवकथन केले, तसेच सध्या मंदिरांचे व्यवस्थापन करतांना येणार्या विविध अडचणी आणि आव्हाने यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा